
कौशिक नंदकुमार लेले (८१०००२) यांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठीतुन इतर भाषा शिकता आल्या पाहिजेत ह्या ध्यासाने त्यांनी मराठी - गुजराथी शिकवणारी वेबसाईट सुरु केली. सध्या चिनी (मॅंडरीन) शिकत असताना यु ट्युब व्हिडोओने सुरवात केली. आजवर सुमारे २५० पुस्तकांची परिक्षणे लिहीली आहेत. लेले हितवर्धक मंडळातर्फे कौशिक नंदकुमार यांचे अभिनंदन व शुभेच्छा. कौशिक नंदकुमार लेले जन्म १३ एप्रिल १९८५. डोंबिवली शिक्षण - संगणक अभियंता (Computer engineer). जन्म आणि शिक्षण डोंबिवली येथे पूर्ण. व्यवसाय - सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून बहुराष्ट्रीय कंपनीत पुणे येथे कार्यरत. भाषाप्रेमी आणि वाचनप्रेमी. स्वतः स्वअभ्यासातून तमिळ आणि गुजराथी शिकलो आहे. विविध भाषाविषयक उपक्रम सुरु आहेत. त्यातल्या काही उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे - १) Online Marathi and Gujarati language teaching मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या १० वर्षांपासून ३ online tutorials चालवत आहे - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. या ट्युटोरिअल्स मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई.) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी, गुजराती शिकत आहेत. तेही पूर्णपणे मोफत ! http://LearnMarathiWithKaushik.com या वेबसाईटच्या मुख्य पानावर तीन कोर्सेस च्या लिंक्स दिसतील. आणि परदेशी व्यक्ती मराठी बोलतानाचे व्हिडीओ सुद्धा पाहायला मिळतील. 2) Book reviews मला वाचनाची आवड आहे, गेल्या काही वर्षांपासून पुस्तक परीक्षणे लिहितो आहे. इंटरनेटवर इंग्रजी पुस्तकांची माहिती व परीक्षणे सहज आढळतात. त्यातुलनेत मराठी पुस्तकांची माहिती कमी आढळते. म्हणून मी शक्यतो मराठी पुस्तकांची परीक्षणे लिहितो आहे. इतर भाषिक पुस्तकांची परीक्षणे देखील मराठीत लिहितो आहे,. सध्या अडीचशे हून अधिक पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत. मी लिहिलेली पुस्तक परीक्षणे या लिंकवर वाचू शकाल. http://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/ 3) Learn Mandarin Chinese through Marathi मी सध्या चिनी भाषा स्वअभ्यासातून शिकतो आहे. मागच्या वर्षी HSK-२ ९५% नी उत्तीर्ण झालो. त्याच जोडीला मराठी भाषेतून चिनी भाषा शिकवणारी यूट्युब व्हिडीओ मालिका मी बनवत आहे ."गंमत चिनी भाषेची...मराठीतून". मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा हा अजून एक प्रयत्न. प्लेलिस्ट लिंक. https://youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe 4) Learn Marathi through Hebrew इस्रायल मध्ये राहणाऱ्या इव्हा तळेगांवकर हिब्रू भाषेतून मधून मराठी शिकवतात. त्या लिहीत असलेले पाठसुद्धा माझ्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे; जेणेकरून ते पण लोकांना ऑनलाईन शिकता येईल. http://learnmarathiwithkaushik.com/learn-marathi-through-hebrew/ लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, इंडियन एक्सप्रेस, स्थानिक मासिके इ. वेगवेगळ्या मुद्रित माध्यमांनी ह्या बद्दल लेख छापले आहेत. ऑनलाईन मुलाखती झाल्या आहेत. ३० एप्रिल २०२३ रोजी "आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार" प्राप्त